नवी दिल्ली : नीट प्रश्नपत्रिका.
गैरप्रकरणानंतर चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या धर्तीवर आता ई-२० जनता पार्टी नावाचा नवा नागरिक मंच पुढे आला आहे. देशभरातील इंधन पंपांवर ई-२० इंधनाबरोबरच शंभर टक्के पेट्रोल खरेदी करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी इ 20 जनता पार्टी करू लागली.
मागण्या काय आहेत –
ई-२० इंधनाबरोबरच शंभर टक्के पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करावा. इंधन प्रकाराचे स्पष्ट नामांकन इंधन पंपांवर करावे. विविध इंधन मिश्रणांचे फायदे, तोटे आणि खर्च यांची अधिकृत माहिती सार्वजनिक करावी. ग्राहकांना गरजेनुसार इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
