
🔯 आजचे राशीभविष्य : २२ नोव्हेंबर २०२६
मेष : शुभ अंक १ | शुभ रंग – डाळिंबीआज मन थोडे अस्वस्थ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घाईघाईने घेऊ नका. महत्त्वाच्या कामांमध्ये योग्य व्यक्तींचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. संयम आणि सकारात्मक विचार ठेवा.
वृषभ : शुभ अंक ५ | शुभ रंग – हिरवाकौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरातील काही विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कायदेशीर किंवा वादग्रस्त बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. आज मर्यादा ओळखून वागणे हिताचे ठरेल.
मिथुन : शुभ अंक ४ | शुभ रंग – चंदेरीआज अनपेक्षितपणे एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. महत्त्वाची कामे योग्य नियोजनाने पूर्ण होतील. वेळेचा सदुपयोग केल्यास अपेक्षित यश मिळू शकते
कर्क : शुभ अंक २ | शुभ रंग – निळानोकरी आणि व्यवसायातील कामांचा व्याप वाढू शकतो. वरिष्ठांशी बोलताना विचारपूर्वक शब्दांचा वापर करा. कौटुंबिक कामांसाठी वेळ द्यावा लागेल. संयम ठेवल्यास दिवस चांगला जाईल.
सिंह : शुभ अंक ६ | शुभ रंग – जांभळाआज आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. शिक्षण आणि परदेशाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : शुभ अंक ३ | शुभ रंग – सोनेरीआर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही व्यवहारापूर्वी सर्व बाबी तपासून पाहा. अनावश्यक जोखीम टाळा.
तूळ : शुभ अंक २ | शुभ रंग – पिस्ता, कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याला महत्त्व मिळेल. मात्र, विरोधकांशी संवाद साधताना संयम राखणे आवश्यक आहे. आज जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यास नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात.
वृश्चिक : शुभ अंक ४ | शुभ रंग – आकाशी, नातेवाईकांकडून एखादी महत्त्वाची बातमी समजू शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नियोजनाला प्राधान्य द्या.
धनु : शुभ अंक ७ | शुभ रंग – मोतिया, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून संपर्कात नसलेल्या एखाद्या प्रिय व्यक्तीशी पुन्हा संवाद होऊ शकतो. दिवस उत्साहात जाईल.
मकर : शुभ अंक १ | शुभ रंग – स्ट्रॉबेरी, बांधकाम आणि मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. आर्थिक लाभाची संधी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल.
कुंभ : शुभ अंक १ | शुभ रंग – पांढरा, आज एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. कलाकार आणि गायकांना त्यांच्या कामाचे कौतुक ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कायम ठेवा.
मीन : शुभ अंक ८ | शुभ रंग – राखाडी, आज घरी पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तींना मदत करण्याची संधी मिळेल. मात्र, स्पष्ट बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. तुमच्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची दक्षता घ्या.-
–विशेष सूचना : वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय अंदाजांवर आधारित असून ते केवळ मनोरंजन आणि सामान्य माहितीसाठी आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा.सौजन्य : दिशा टाइम्स (Disha Times)
