
नाशिकमध्ये मिसळप्रेमींना धक्का! ‘पेरूची वाडी’सह २ हॉटेल्सवर FDA ची धाड, ३३ हजारांची शेव जप्तनाशिक : मिसळसाठी प्रसिद्ध असलेल्या मखमलाबाद आणि मुंगसे परिसरातील हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन हॉटेल्सचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले असून, एका ठिकाणाहून ३३ हजार रुपये किमतीची शेव जप्त करण्यात आली आहे.मागील आठवड्याभरापासून अन्न व औषध प्रशासनाकडून शहरात धडक मोहीम सुरू आहे. सहआयुक्त मंगेश माने, तसेच सहाय्यक आयुक्त अन्न, विनोद धवड, ज्ञानेश्वर महाले आणि संदीप देवरे यांच्या पथकाने ही तपासणी केली.कॉलेजरोड, गंगापूररोड आणि सातपूर परिसरातील मिसळच्या दुकानांवर यापूर्वीच कारवाई झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि. २३) पुन्हा पथकाने मखमलाबाद शिवारा जवळील एका रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये तपासणी केली.तिथे अन्नपदार्थ बनवण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण आढळली. हॉटेल यात्री (सीबीएस) येथेही अस्वच्छता दिसून आली. त्याशेजारील हॉटेल जनता येथेही अस्वच्छता होती. अन्नपदार्थ उघड्यावर विक्रीसाठी ठेवल्याचे तपासणीत उघड झाले.पेरूची वाडी, गट क्रमांक ३७९, मुंगसे येथे लेबलमध्ये दोष असण्याचा आणि शेव कमी दर्जाची असण्याचा संशय आल्याने ३३ हजारांची ११० किलो शेव जप्त करण्यात आली.धाड पडूनही हॉटेल्स पुन्हा सुरू!मोठ्या हॉटेल्सवर कारवाई होऊन दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा ही हॉटेल्स सुरू झाल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून त्यांनी नियमांचे पालन केले असेल तर ते सुरू होऊ शकतात, असे कारण सांगितले जात आहे.जुन्या नाशकात, भद्रकाली, द्वारका, इंदिरानगर, वडाळा गाव परिसरातील हॉटेल्सचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.येथे करा तक्रारहॉटेल्स किंवा कोणत्याही अन्न आस्थापनेतील पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अथवा सुरक्षिततेबाबत नागरिकांना शंका आल्यास प्रशासनाच्या complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि त्याअंतर्गत नियम व विनियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
