
आजचे पंचांगवार – मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६, आज विशेष – त्रिपुरारी पौर्णिमा, पर्वकाळराहू काळ – दुपारी ३.०० ते ४.३०दिशा शूल – उत्तरेस असेलशिवलिखित, शुभमुहूर्त – सकाळी ११.०० ते १२.३० लाभ, १२.३० ते २.०० अमृत, दुपारी ३.०० ते ४.३० शुभ, ७.३० ते ९.०० लाभ.
मेष : शुभ अंक ९, शुभ रंग केशरी : आज कामात उत्साह वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. घरात आनंदी वातावरण राहील. पैशाच्या व्यवहारात सावध राहा. प्रवासाचे योग आहेत.
वृषभ : शुभ अंक २, शुभ रंग पांढरा : जुनी गुंतवणूक फायदा देईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद टाळा. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन : शुभ अंक ५, शुभ रंग हिरवा : आज नवीन ओळखी होतील. व्यवसायात नवीन संधी मिळेल. मित्रांची मदत होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
कर्क : शुभ अंक ७, शुभ रंग मोतिया : कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. घरातील कामात वेळ जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी प्रेमळ बोला.
सिंह : शुभ अंक १, शुभ रंग गुलाबी : आज दिवस धावपळीचा जाईल. वरिष्ठांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका. स्वतःच्या कामावर लक्ष द्या. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल.
कन्या : शुभ अंक ४, शुभ रंग पिस्ता : नोकरीत नियम काटेकोर पाळावे लागतील. सरकारी कामे होतील. शिक्षणासाठी परदेशाची संधी चालून येईल. संयम ठेवा.
तूळ : शुभ अंक ८, शुभ रंग आकाशी : व्यवसायात स्पर्धा वाढेल. ग्राहकांची वाट पाहावी लागेल. जाहिरातीवर खर्च करावा लागेल. संध्याकाळनंतर दिवस चांगला जाईल.
वृश्चिक : शुभ अंक १, शुभ रंग लाल : आज फक्त स्वतःच्या कामावर लक्ष द्या. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. दिलेला शब्द पाळा, त्यामुळे विश्वास वाढेल.
धनू : शुभ अंक ३, शुभ रंग सोनेरी : कामात चूक होणार नाही याची काळजी घ्या. व्यसनांपासून दूर राहा. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्या.
मकर : शुभ अंक ५, शुभ रंग निळा : उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल कराल. महागड्या वस्तू घेण्याचा मोह होईल. कलाकारांना मेहनतीचे फळ मिळेल.
कुंभ : शुभ अंक ४, शुभ रंग जांभळा : घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. मुलांचा अभ्यासात लक्ष लागेल. आईचे मन दुखवू नका. गृहउद्योग तेजीत चालतील.
मीन : शुभ अंक २, शुभ रंग पिवळा : प्रवासाचे योग आहेत. लहान भावाला मदत कराल. घराबाहेर वाद टाळा. मन शांत ठेवा.
