
आजचा दिवस काही राशींसाठी नवीन संधी घेऊन येणारा आहे, तर काहींनी आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहण्याची गरज आहे. जाणून घेऊया मेष ते मीन या १२ राशींचे आजचे राशीभविष्य, शुभ अंक आणि शुभ रंग.
♈ मेष राशी शुभ अंक : १ | शुभ रंग : राखाडी
आज आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करणे टाळा. दूर राहणाऱ्या नातेवाइकांकडून संपर्क होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल.
♉ वृषभ राशी शुभ अंक : ३ | शुभ रंग : सोनेरी
व्यवसायात ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्यास चांगले निर्णय घेता येतील. मित्रमंडळींकडून महत्त्वाचे सहकार्य मिळू शकते. काही जणांना नवीन घरात प्रवेश करण्याची संधी मिळण्याचे संकेत आहेत.
♊ मिथुन राशी शुभ अंक : ४ | शुभ रंग : हिरवा
व्यवसायात नवीन ग्राहक जोडले जाण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल. मात्र कामाच्या व्यापात घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या.
♋ कर्क राशी शुभ अंक : २ | शुभ रंग : जांभळा
कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित अडचणी समोर येऊ शकतात. मात्र संयम आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर परिस्थिती हाताळता येईल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.
♌ सिंह राशी शुभ अंक : ६ | शुभ रंग : आकाशी
आज कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. काही बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.
♍ कन्या राशी शुभ अंक : ५ | शुभ रंग : चंदेरी
आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या विचारांना नवी दिशा मिळू शकते. अचानक मिळालेल्या संधींचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्या.
♎ तूळ राशी शुभ अंक : २ | शुभ रंग : जांभळा
आज काही कारणांमुळे विरोधकांचा हस्तक्षेप वाढल्याचे जाणवू शकते. त्यामुळे महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक व्यवहारात अडकलेली रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागू शकतात.
♏ वृश्चिक राशी शुभ अंक : ९ | शुभ रंग : निळा
आज तुमच्यातील कलागुणांना वाव मिळण्याची शक्यता आहे. आवडत्या छंदासाठी वेळ काढता येईल. मित्रपरिवारासोबत एखाद्या छोट्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. प्रकृतीची काळजी घेणेही आवश्यक आहे.
♐ धनु राशी शुभ अंक : २ | शुभ रंग : पिस्ता
मालमत्ता खरेदी-विक्रीसंदर्भातील व्यवहार अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या अभ्यासाकडे आणि त्यांच्या शिस्तीकडे लक्ष देणे आज महत्त्वाचे ठरेल.
♑ मकर राशी शुभ अंक : ६ | शुभ रंग : पांढरा
आज तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या विषयांवर विनाकारण वाद घालणे टाळा. शांतपणे चर्चा केल्यास अनेक प्रश्न सहज मार्गी लागू शकतात.
♒ कुंभ राशी शुभ अंक : १ | शुभ रंग : तांबडा
आर्थिक नियोजनामुळे कामांमध्ये उत्साह टिकून राहील. पूर्वी थांबलेले उपक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळू शकते. दिलेला शब्द पाळल्यास इतरांचा विश्वास अधिक दृढ होईल.
♓ मीन राशी शुभ अंक : ६ | शुभ रंग : मोतिया
आज उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे आर्थिक नियोजनाकडे विशेष लक्ष द्या. स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे काही जवळच्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलताना शब्द जपून वापरा.
विशेष सूचना : वरील राशीभविष्य हे ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य अंदाज आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातील निर्णय घेताना स्वतःचा विवेक आणि परिस्थिती लक्षात घ्यावी.
Disha Times | बातमी आपल्या हक्काची!
