
मेष : शुभ अंक ४ | शुभ रंग – लाल
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक राहील. कामातील तुमची कामगिरी वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील एखाद्या शुभ कामाचे नियोजन होण्याची शक्यता आहे.
वृषभ : शुभ अंक ६ | शुभ रंग – मोती
आज आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल.
मिथुन : शुभ अंक ९ | शुभ रंग – गुलाबी
आज तुमची आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना संयम ठेवा. गोड बोलण्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. नवीन संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा.
कर्क : शुभ अंक २ | शुभ रंग – हिरवा
आज काही कामांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. इतरांच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबीयांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
सिंह : शुभ अंक १ | शुभ रंग – पिवळा
आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास चांगले यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. अनावश्यक खर्च टाळा आणि वेळेचे योग्य नियोजन करा.
कन्या : शुभ अंक ५ | शुभ रंग – सोनेरी
आज आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ ठेवा. मित्रमंडळींकडून सहकार्य मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडू शकते.
तूळ : शुभ अंक ७ | शुभ रंग – चंदेरी
आज तुमच्या कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. त्यामुळे महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करा. कामाच्या व्यापातून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. कुटुंबातील व्यक्तींसोबत संवाद वाढवल्यास गैरसमज दूर होतील.
वृश्चिक : शुभ अंक ८ | शुभ रंग – जांभळा
आज काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. नोकरी किंवा व्यवसायात संयमाने निर्णय घेतल्यास फायदा होईल.
धनु : शुभ अंक ३ | शुभ रंग – भगवा
आज कामाच्या ठिकाणी काही अनपेक्षित घडामोडी होऊ शकतात. वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या.
मकर : शुभ अंक ६ | शुभ रंग – स्टोबेरी
आज व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांना सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ : शुभ अंक १ | शुभ रंग – पिस्ता
आज महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहाल. मात्र कामाचा ताण वाढू देऊ नका. आरोग्य आणि विश्रांतीकडे लक्ष द्या. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे.
मीन : शुभ अंक ८ | शुभ रंग – पांढरा
आज शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन ओळखीतून भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.
टीप : वरील राशिभविष्य हे ज्योतिषीय अंदाजांवर आधारित असून ते मनोरंजन व सामान्य मार्गदर्शनासाठी आहे.
