
आजचे राशिभविष्य – गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६
मेष : शुभ अंक ५ | शुभ रंग पांढरा, आज तुमच्यातील आत्मविश्वास आणि काम करण्याची ऊर्जा वाढेल. महत्त्वाच्या कामांमध्ये घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
वृषभ : शुभ अंक ३ | शुभ रंग मोतिया, आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येतील. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा.
मिथुन : शुभ अंक ६ | शुभ रंग गुलाबी, पूर्वी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे किंवा महत्त्वाची वस्तू परत मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
कर्क : शुभ अंक ४ | शुभ रंग राखाडी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल. कामानिमित्त प्रवास करण्याची शक्यता आहे.
सिंह : शुभ अंक १ | शुभ रंग पिस्ता, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. नवीन काम सुरू करण्यासाठी सकारात्मक वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये आनंदाची बातमी मिळू शकते.
कन्या : शुभ अंक २ | शुभ रंग डाळिंबी, कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. संयम आणि नियोजन महत्त्वाचे ठरेल.
तूळ : शुभ अंक ८ | शुभ रंग सोनेरी, आज काही कामांमध्ये अपेक्षित यश मिळण्यास वेळ लागू शकतो. मात्र तुमचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा.
वृश्चिक : शुभ अंक ९ | शुभ रंग स्टील ग्रे, व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. ग्राहकांची संख्या वाढल्याने कामाला गती मिळू शकते. जाहिरात आणि नवीन उपक्रमांसाठी दिवस अनुकूल ठरेल.
धनु : शुभ अंक ५ | शुभ रंग भगवाव्यावसायिक निर्णय घेताना सहकाऱ्यांचा आणि भागीदारांचा सल्ला घ्या. कुटुंबातील व्यक्तींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.
मकर : शुभ अंक ७ | शुभ रंग चंदेरी, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास फायदा होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखणे फायदेशीर ठरेल.
कुंभ : शुभ अंक १ | शुभ रंग निळा, आज तुमच्या कल्पकतेला चांगला वाव मिळेल. नवीन कामांमध्ये रस निर्माण होईल. एखाद्या व्यावसायिक व्यवहारातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मीन : शुभ अंक ४ | शुभ रंग जांभळा, कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. घरासाठी नवीन वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
टीप : वरील राशिभविष्य हे ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य स्वरूपाचे अंदाज आहेत.
