
🔯 आजचं राशिभविष्य | गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६
– दिशा टाईम्स
♈ मेष : शुभ अंक ९, शुभ रंग सोनेरी
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. चांगल्या मित्रांचा सहवास घडेल. आज तुम्ही सहज घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. स्वप्नपूर्ती होईल.
♉ वृषभ : शुभ अंक ७, शुभ रंग चंदेरी
नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. कामाच्या ठिकाणी नियम मात्र मोडू नका. कायद्यात राहणे फायद्यात राहील. आज रिकामटेकड्या गप्पा मात्र कटाक्षाने टाळा.
♊ मिथुन : शुभ अंक २, शुभ रंग पिवळा
उद्योगधंद्याच्या दृष्टीने आज विरोधी दिवस असल्याने हातचे सोडून पळत्यामागे जाऊ नका. धोपट मार्गावरून चालणे हिताचे राहील. देव साथ देईल.
♋ कर्क : शुभ अंक ६, शुभ रंग राखाडी
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधावा. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज वैवाहिक जीवनात दोघात तिसरा नको.
♌ सिंह : शुभ अंक ५, शुभ रंग डाळिंबी
देण्याघेण्याच्या व्यवहारात सतर्क राहा. आज भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका. एखाद्या विश्वासू मित्राकडूनही दगाफटका होऊ शकतो.
♍ कन्या : शुभ अंक ४, शुभ रंग जांभळा
आज अति आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. महत्त्वाच्या प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. खाण्यापिण्यावर कंट्रोल असू द्या. पोट बिघडेल.
♎ तूळ : शुभ अंक १, शुभ रंग निळा
तरुणांच्यात चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलावंत मिळालेल्या संधीचे सोने करतील. आज काही भाग्यवान महिला उंची वस्त्रे व रत्ने खरेदी करतील.
♏ वृश्चिक : शुभ अंक ३, शुभ रंग भगवा
मुले आज मान मोडून अभ्यास करतील. घरात सज्जनांची उठबस राहील. गृहिणींना लघुउद्योगातून चांगली मिळकत होईल. आईचे मन मोडू नका.
♐ धनू : शुभ अंक ८, शुभ रंग पांढरा
मिथुन राशीतून चंद्रभ्रमण होत असताना तुम्ही चर्चेपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज लहान भावाशी सुसंवाद राहील. प्रवास घडण्याची शक्यता.
♑ मकर : शुभ अंक ७, शुभ रंग पिस्ता
विविध मार्गांनी पैसा येईल. आपले आवडते छंद जपण्यासाठी खर्च कराल. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. प्रवास आवश्यक नसेल तर टाळा.
♒ कुंभ : शुभ अंक ५, शुभ रंग मोतिया
तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. समोर येणारी व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. एखादी हरवलेली वस्तू परत शोधल्यास सापडू शकेल.
♓ मीन : शुभ अंक १, शुभ रंग तांबडा
महत्त्वाच्या कागदपत्रांची तसेच मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. काही दुरची नाती संपर्कात येतील. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल.
