
मेष : शुभ अंक १, शुभ रंग भगवा : आज तुमच्यासाठी लाभाचा दिवस असल्याने तुमच्या काही अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील. आज आपला मोठेपणा जपण्यासाठी तुम्ही उदार मनाने खर्च कराल.
वृषभ : शुभ अंक ६, शुभ रंग मोतिया : उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल दिवस. नवीन व्यवसायिकांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. कार्यक्षेत्रात यश जवळच आल्याची जाणीव होईल.
मिथुन : शुभ अंक ५, शुभ रंग पांढरा : व्यवसायात आकस्मिक अडचणींना तुम्ही धैर्याने तोंड द्याल. घरात वडीलधारी मंडळी आपलेच खरे करतील. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाचे पाठबळ राहील.
कर्क : शुभ अंक ३, शुभ रंग हिरवा : राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना आपल्या मर्यादेत राहिलेले बरे. नवीन व्यवसायाची सुरुवात आज नकोच. जोडीदारास धनलाभ होईल.
सिंह : शुभ अंक २, शुभ रंग जांभळा : विविध मार्गांनी धन येईल. कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग प्रशस्त होईल. आज वेळेचे योग्य नियोजन मात्र गरजेचे राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
कन्या : शुभ अंक ४, शुभ रंग स्ट्रॉबेरी : नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी असलेले नियम पाळावेत. ज्येष्ठ मंडळींनी तब्येतीस जपावे. खाण्या-पिण्यावर ताबा ठेवा. आज येणी वसूल होतील.
तूळ : शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी : आधुनिक विचारसरणी असलेले लोक आज संपर्कात येतील. आज तुम्ही व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. आवडते छंद जपण्यासाठी वेळ द्याल.
वृश्चिक : शुभ अंक ८, शुभ रंग सोनेरी : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांवर कामाचा ताण वाढेल. गृहउद्योग करणाऱ्या महिलांची मिळकत वाढेल. जागेचे व्यवहार करण्यासाठी दिवस चांगला.
धनु : शुभ अंक ६, शुभ रंग तांबडा : हाती असलेला पैसा खर्च करण्याचे विविध मार्ग सुचतील. मोठ्या मनाने आज तुम्ही गरजूंना मदतीचा हात द्याल. आज जास्त वेळ घराबाहेर जाणार आहे.
मकर : शुभ अंक ७, शुभ रंग मोरपंखी : राशीच्या धनस्थानी चंद्रभ्रमण होत असताना आवश्यक पैसा सहज उपलब्ध होईल. आज वाणीवर लगाम गरजेचा आहे. नेते सभा गाजवतील.
कुंभ : शुभ अंक ९, शुभ रंग चंदेरी : आज तुम्ही एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा फार विचार कराल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. महत्वाच्या चर्चेत आज फक्त ऐकण्याचे काम करा.
मीन : शुभ अंक ४, शुभ रंग पिस्ता : आज दिवस खर्चाचा असताना बिनधास्त खर्च करा. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. बेरोजगारांना घरापासून दूर रोजगाराच्या संधी येतील.
