
🪔
🐏 ♈ मेष (Aries)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे.
💼 नोकरी/व्यवसाय: कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. नवीन डील मिळण्याची शक्यता आहे.
💰 पैसा: आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. पण उधारी देऊ नका.
❤️ कुटुंब/प्रेम: घरात लक्ष्मीपूजनाचा आनंद घ्याल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
🩺 तब्येत: थोडा थकवा जाणवेल, रात्री लवकर झोपा.
शुभ रंग: लाल | शुभ अंक: ७
उपाय: सकाळी श्री सूक्ताचे पठण करा.
🐂 ♉ वृषभ (Taurus)
आज लक्ष्मी प्रसन्न आहे.
💼 नोकरी/व्यवसाय: नोकरीत वरिष्ठ खुश होतील. व्यवसायात मोठा फायदा होईल.
💰 पैसा: धनलाभाचे प्रबळ योग. सोने-चांदी खरेदीसाठी दिवस उत्तम.
❤️ कुटुंब/प्रेम: जुन्या मित्रांची भेट होईल. घरात धार्मिक वातावरण राहील.
🩺 तब्येत: पोटाचा त्रास होऊ शकतो, फराळ जपून खा.
शुभ रंग: पांढरा | शुभ अंक: ६
उपाय: लक्ष्मीला पांढरी मिठाई आणि कमळ अर्पण करा.
👫 ♊ मिथुन (Gemini)
आज नवीन संधींचा दिवस.
💼 नोकरी/व्यवसाय: नवीन कामाची संधी मिळेल. विचारपूर्वक निर्णय घ्या, घाई करू नका.
💰 पैसा: खर्च वाढेल पण उत्पन्नही वाढेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला नाही.
❤️ कुटुंब/प्रेम: कुटुंबासोबत वेळ घालवा. महिलांना मनासारखे घडेल.
🩺 तब्येत: मानसिक ताण जाणवेल, शांत राहा.
शुभ रंग: हिरवा | शुभ अंक: ५
उपाय: गणपतीला दुर्वा आणि लाल फूल वाहा.
🦀 ♋ कर्क (Cancer)
आज संयम ठेवण्याचा दिवस.
💼 नोकरी/व्यवसाय: नवीन संधी मिळतील पण यशासाठी जास्त कष्ट करावे लागतील.
💰 पैसा: खर्चावर नियंत्रण ठेवा. उगाच मोठी खरेदी करू नका.
❤️ कुटुंब/प्रेम: आई-वडिलांची काळजी घ्या. घरात लहान वाद होऊ शकतो, शांतपणे सोडवा.
🩺 तब्येत: सर्दी-खोकल्यापासून सावध राहा.
शुभ रंग: क्रीम / पांढरा | शुभ अंक: २
उपाय: शिवलिंगाला पाणी आणि बेलपत्र अर्पण करा.
🦁 ♌ सिंह (Leo)
आज मान-सन्मान वाढेल.
💼 नोकरी/व्यवसाय: आत्मविश्वास वाढेल. नोकरीत प्रमोशनची चर्चा होईल.
💰 पैसा: आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.
❤️ कुटुंब/प्रेम: जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल.
🩺 तब्येत: डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
शुभ रंग: केशरी | शुभ अंक: १
उपाय: सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करा.
👧 ♍ कन्या (Virgo)
आज तुमची बुद्धी कामाला येईल.
💼 नोकरी/व्यवसाय: नवीन जबाबदारी मिळेल. कामात तुमची हुशारी दिसून येईल.
💰 पैसा: पैशाचे नियोजन करा. बचतीकडे लक्ष द्या.
❤️ कुटुंब/प्रेम: कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवाल.
🩺 तब्येत: पचनाचा त्रास होऊ शकतो, हलका आहार घ्या.
शुभ रंग: निळा | शुभ अंक: ५
उपाय: गरजू व्यक्तीला अन्न किंवा कपडे दान करा.
⚖️ ♎ तूळ (Libra)
आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली.
💼 नोकरी/व्यवसाय: इस्टेटचा जुना प्रश्न सुटेल. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत.
💰 पैसा: धनलाभ होईल. लक्ष्मीपूजनाने विशेष लाभ मिळेल.
❤️ कुटुंब/प्रेम: घरात सुख-शांती राहील. जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल.
🩺 तब्येत: तब्येत चांगली राहील, उत्साह वाढेल.
शुभ रंग: गुलाबी | शुभ अंक: ६
उपाय: लक्ष्मीला कमळ आणि गुलाबाचे फूल अर्पण करा.
🦂 ♏ वृश्चिक (Scorpio)
आज आनंदाची बातमी मिळेल.
💼 नोकरी/व्यवसाय: नोकरी बदलायचा विचार असेल तर आजचा दिवस योग्य आहे. महिलांना कामात यश.
💰 पैसा: जुने देणे फिटेल. नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडेल.
❤️ कुटुंब/प्रेम: घरात आनंदी वातावरण. मित्रांसोबत भेट होईल.
🩺 तब्येत: पाठदुखीचा त्रास होऊ शकतो.
शुभ रंग: मरून | शुभ अंक: ९
उपाय: शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा.
🏹 ♐ धनु (Sagittarius)
आज नशिबाची साथ मिळेल.
💼 नोकरी/व्यवसाय: अडकलेली कामे पूर्ण होतील. कामात जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
💰 पैसा: आर्थिक परिस्थिती सुधारेल. जुनी गुंतवणूक फायदा देईल.
❤️ कुटुंब/प्रेम: नातेवाईकांची भेट होईल. दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल.
🩺 तब्येत: पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो.
शुभ रंग: पिवळा | शुभ अंक: ३
उपाय: पिवळी वस्तू, हरभरा डाळ दान करा.
🐐 ♑ मकर (Capricorn)
आज दूरदृष्टीने काम करा.
💼 नोकरी/व्यवसाय: कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. कलाकारांना नवीन संधी मिळतील.
💰 पैसा: जुनी गुंतवणुकीतून चांगली बातमी मिळेल. पैसा जपून वापरा.
❤️ कुटुंब/प्रेम: कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद घ्याल.
🩺 तब्येत: थकवा जाणवेल, विश्रांती घ्या.
शुभ रंग: निळा | शुभ अंक: ८
उपाय: काळ्या तिळाचे दान करा, शनि मंदिरात दिवा लावा.
🏺 ♒ कुंभ (Aquarius)
आज संयम ठेवाच लागेल.
💼 नोकरी/व्यवसाय: नोकरीत आपलेच खरे करण्यामुळे तोटा होऊ शकतो. इतरांचे ऐकून घ्या.
💰 पैसा: फालतू खर्च टाळा. कोणालाही पैसे उधार देऊ नका.
❤️ कुटुंब/प्रेम: घरात वाद होऊ शकतो, शांत राहा.
🩺 तब्येत: डोळ्यांचा त्रास होऊ शकतो, मोबाईल कमी वापरा.
शुभ रंग: आकाशी | शुभ अंक: ४
उपाय: शनिवारी शनि स्तोत्र म्हणा, दिवा लावा.
🐟 ♓ मीन (Pisces)
आज मनातील इच्छा पूर्ण होईल.
💼 नोकरी/व्यवसाय: नवीन संधी मिळतील. व्यवसायात फायदा होईल.
💰 पैसा: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. लक्ष्मीची कृपा राहील.
❤️ कुटुंब/प्रेम: नातेवाईकांकडून शुभ बातमी मिळेल. मित्रांसोबत जुन्या आठवणी ताज्या होतील.
🩺 तब्येत: तब्येत चांगली राहील, मन प्रसन्न राहील.
शुभ रंग: पिवळा | शुभ अंक: ७
उपाय: संध्याकाळी लक्ष्मीची आरती करा, घरात दिवे लावा.
🪔 लक्ष्मीपूजन मुहूर्त: सायं. ६:२६ ते रात्री ८:२६
- दिशा टाइम्स, नाशिक
