
नाशिक : सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या चढ-उतारांदरम्यान नाशिकच्या सराफा बाजारातून ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४ हजार ५४० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रति किलो ९ हजार रुपयांची घट झाली आहे.सोन्याचे आजचे दर काय?नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २३ हजार २७० रुपये झाला आहे. काल हाच दर १ लाख २७ हजार ८१० रुपये होता. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४ हजार ५४० रुपयांची घसरण झाली आहे.२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर १ लाख १२ हजार ९९० रुपये असून काल तो १ लाख १७ हजार १६० रुपये होता. म्हणजेच २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४ हजार १७० रुपयांची घट झाली आहे.तर १८ कॅरेट सोन्याचा दर आज ९२ हजार ४५२ रुपये असून कालच्या तुलनेत ३ हजार ४०५ रुपयांची घसरण झाली आहे.चांदीच्या दरातही मोठी घसरणसोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये आज चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८० हजार ९०० रुपये नोंदवण्यात आला आहे. बुधवारी चांदीचा दर १ लाख ८९ हजार ९०० रुपये होता. त्यामुळे एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल ९ हजार रुपयांची घट झाली आहे.ग्राहकांना दिलासा; खरेदीकडे लक्षसोन्या-चांदीच्या दरातील घसरणीमुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष सराफा बाजाराकडे लागले आहे. लग्नसराई आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दरातील या घसरणीचा ग्राहकांना फायदा होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.आजचा बाजारभाव (२६ नोव्हेंबर २०२६)- २४ कॅरेट सोने : ₹१,२३,२७० प्रति १० ग्रॅम- २२ कॅरेट सोने : ₹१,१२,९९० प्रति १० ग्रॅम- १८ कॅरेट सोने : ₹९२,४५२ प्रति १० ग्रॅम- चांदी : ₹१,८०,९०० प्रति किलो.
टीप : हे उपलब्ध ऑनलाइन बाजारभाव आहेत. प्रत्यक्ष सराफा बाजारातील दर, GST आणि घडणावळीनुसार अंतिम किंमत बदलू शकते.
