
आजचं राशी भविष्य | २१ नोव्हेंबर २०२६ | शनिवार
♈ मेष – शुभ अंक: ४, शुभ रंग: चंदेरी
आवाक्याबाहेर चाललेल्या खर्चावर लगाम घालणं गरजेचं आहे. आज प्रवास टाळता येणार नाही. दानी व्यक्ती दानधर्म करतीलच. ज्येष्ठांच्या वयाचा मान राखावा.
♉ वृषभ – शुभ अंक: २, शुभ रंग: निळा
कार्यक्षेत्रात एखादी चांगली घटना घडेल. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला दुरावलेली एखादी प्रिय व्यक्ती अचानक संपर्कात येईल. मित्र दिलेली आश्वासने पाळतील.
♊ मिथुन – शुभ अंक: १, शुभ रंग: डाळिंबी
नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे, पण त्यांच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्यावं लागेल.
♋ कर्क – शुभ अंक: ५, शुभ रंग: हिरवा
ज्येष्ठ मंडळींना आज अध्यात्माची ओढ लागेल. काही जण एखाद्या गुरुकुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेतील. उच्चशिक्षितांना विदेशगमनाचे वेध लागतील.
♌ सिंह – शुभ अंक: ३, शुभ रंग: सोनेरी
आज तुमच्या कार्यक्षेत्रात गोडबोल्या मंडळींपासून सावध राहा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. काही गुप्त शत्रू सक्रिय असू शकतात. कोणतीही रिस्क नकोच.
♍ कन्या – शुभ अंक: ६, शुभ रंग: जांभळा
व्यवसायात भागीदारांत तसेच पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहील. कलेच्या क्षेत्रात चढाओढ राहील. आज विरोधकांच्या हालचालींवर नजर असायला हवी.
♎ तूळ – शुभ अंक: ४, शुभ रंग: आकाशी
उद्योग-व्यवसायात कष्टांना दुसरा पर्याय नाही. नोकरदारांनी वरिष्ठांच्या आज्ञेबाहेर जाऊ नये. खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा. तब्येतीस जपा.
♏ वृश्चिक – शुभ अंक: २, शुभ रंग: पिस्ता
आज ज्येष्ठ मंडळींना संततीकडून सुवार्ता येतील. उच्चशिक्षणाच्या अपेक्षा वाढतील. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.
♐ धनु – शुभ अंक: ९, शुभ रंग: स्ट्रॉबेरी
आज कुटुंबीयांसह वेळ घालवण्याची तीव्र इच्छा होईल. बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग असलेल्या घरगुती कामातही आज लक्ष घालावं लागणार आहे.
♑ मकर – शुभ अंक: ७, शुभ रंग: मोतिया
महत्त्वाच्या कामासाठी जवळपासचे प्रवास घडतील. थोडेफार घरदुरुस्तीचे किंवा वाहन दुरुस्तीचे खर्च संभवतात. काही गुपिते उघड होतील. कमी बोला.
♒ कुंभ – शुभ अंक: ८, शुभ रंग: राखाडी
राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने पैशाचा ओघ चालू राहील. आज फक्त वाणीवर ताबा असू द्या. गोड बोलून बरीचशी कामं सोपी होतील.
♓ मीन – शुभ अंक: १, शुभ रंग: पांढरा
आज आनंदी व उत्साही असाल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहाल. घरात मात्र जोडीदाराच्या मतास प्राधान्य देणं हिताचं राहील.
