
मुंबई (प्रतिनिधी) : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित उत्पादनांच्या विक्रीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर मोठी कारवाई केली आहे. आवश्यक नियामक मंजुरी नसलेल्या घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आरोग्यपूरक पदार्थांचा तब्बल १.३९ कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आरोग्यपूरक उत्पादनांच्या बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.१७ ठिकाणी एकाच वेळी तपासणी१३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सहा विभागांमध्ये FDA च्या पथकांनी एकाच वेळी तपासणी मोहीम राबवली. पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांतील १७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.या मोहिमेत आरोग्यपूरक पदार्थ, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली.FSSAI ने नाकारलेल्या घटकांचा वापरतपासणीदरम्यान काही उत्पादनांमध्ये मॅग्नेशियम अॅसिटाइल टॉरेट आणि निकोटिनामाइड मोनोन्यूक्लियोटाइड या घटकांचा वापर झाल्याचे आढळले. या घटकांच्या वापरासाठी सादर करण्यात आलेल्या उत्पादन मंजुरीच्या अर्जांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मान्यता नाकारली होती.FDA च्या माहितीनुसार, आवश्यक मंजुरी न घेता काही उत्पादकांनी उत्पादनांची निर्मिती केली होती. तसेच संबंधित खाद्यपदार्थांच्या श्रेणीचा समावेश परवान्यात नसतानाही काही विक्रेत्यांकडून त्यांची विक्री केली जात होती.भिवंडीतील गोदामातून ४७.६५ लाखांचा साठा जप्तया कारवाईतील मोठी जप्ती ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात करण्यात आली. पिंपळास येथील भूमी वर्ल्ड इंडस्ट्रियल पार्कमधील कांचन फार्मा प्रा. लि.च्या गोदामातून ४७.६५ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
