
मेष : शुभ अंक ६, शुभ रंग मोतिया : कार्यक्षेत्रात गोड बोलून विरोधकांना आपले म्हणणे पटवता येईल. आज अति आक्रमकता टाळायला हवी. घरात जोडीदाराशी संवाद गरजेचा राहील.
वृषभ : शुभ अंक १, शुभ रंग भगवा : एखादे रखडलेले काम आज दुपारनंतर मार्गी लागू शकते. संध्याकाळी कार्यक्षेत्रात तुमचा उत्साह वाढवणारी एखादी बातमी येऊ शकेल. व्यस्त दिवस.
मिथुन : शुभ अंक ३, शुभ रंग हिरवा: प्रयत्नांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. पैशाची आवक समाधानकारक राहील. आज तुम्ही जरा आक्रमकपणे काही निर्णय घ्याल. देवाची साथ राहील.
कर्क : शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा : मोठे आर्थिक व्यवहार टाळा. चुकीच्या घेतलेल्या निर्णयातून एखादे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तरुणांनी गैरवर्तनापासून लांब राहावे.
सिंह : शुभ अंक ४, शुभ रंग स्ट्रॉबेरी : कायदा मोडण्याचा विचार स्वप्नातही करू नका. आपल्या मर्यादेत राहणे हिताचे. कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडणार आहेत.
कन्या : शुभ अंक २, शुभ रंग जांभळा: आईकडील नातलगांशी सलोखा वाढेल. आज काही येणी असल्यास वसूल होतील. नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
तूळ : शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी : कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींकडून उत्कृष्ट कामगिरी होईल. चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. विद्यार्थी अभ्यासावरच लक्ष केंद्रित करतील.
वृश्चिक : शुभ अंक ६, शुभ रंग तांबडा : वास्तू खरेदीच्या दृष्टीने योग्य आर्थिक उलाढाली करतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. तरुणांना प्रेमप्रकरणातून मनस्ताप होईल.
धनु : शुभ अंक ८, शुभ रंग सोनेरी : आज काही महत्त्वाचे समाचार येतील. जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. गायक कलाकारांना आज रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल.
मकर : शुभ अंक ९, शुभ रंग चंदेरी : आज घरी आवडत्या पाहुण्यांचे आगमन संभवते. तुम्ही इतरांना काही महत्त्वपूर्ण सल्ले देऊ शकाल. आज प्रवास त्रासदायक होण्याची शक्यता आहे.
कुंभ : शुभ अंक ७, शुभ रंग मोरपंखी : तुमच्याच राशीत चंद्र प्रवेश होत असताना मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. सामान्य दिवस.
मीन : शुभ अंक ५, शुभ रंग निळा : आज एखाद्या सामाजिक कार्यास तुम्ही यथाशक्ती मदत कराल. घरात थोरांची मने सांभाळावी लागतील. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होण्याची शक्यता दिसते.
