
♈ मेष – शुभ अंक : १ | शुभ रंग : निळाआज तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. कलाकार आणि सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात. महत्त्वाच्या कामात मित्रांची मदत मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
♉ वृषभ – शुभ अंक : ४ | शुभ रंग : गुलाबीआज घरात आनंदाचे वातावरण राहील. पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील उत्साह वाढेल. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. संयम आणि शांतपणे काम केल्यास यश मिळू शकते. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
♊ मिथुन – शुभ अंक : २ | शुभ रंग : मोतियाआज मनात काही नवीन विचार येतील. महत्त्वाच्या कामांमध्ये थोडा संभ्रम निर्माण होऊ शकतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरी आणि व्यवसायात नियोजनाला महत्त्व द्या.
♋ कर्क – शुभ अंक : ६ | शुभ रंग : जांभळाकुटुंबातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या कामांसाठी धाडसी निर्णय घ्यावे लागतील. घरातील व्यक्तींशी संवाद साधल्यास समस्या सुटण्यास मदत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
♌ सिंह – शुभ अंक : ३ | शुभ रंग : मरूनआज तुमच्यासाठी लाभदायक घडामोडी घडू शकतात. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांना महत्त्व मिळेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिवस अधिक चांगला जाईल.
♍ कन्या – शुभ अंक : ५ | शुभ रंग : चंदेरीआज कामाचा व्याप वाढू शकतो. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बोलताना शब्दांचा विचारपूर्वक वापर करा. कौटुंबिक कामांसाठी वेळ काढल्यास नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल.
♎ तूळ – शुभ अंक : ४ | शुभ रंग : डाळिंबीआज धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. शिक्षण आणि करिअरशी संबंधित चांगली संधी मिळू शकते. घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
♏ वृश्चिक – शुभ अंक : ८ | शुभ रंग : सोनेरीआज आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. कोणताही व्यवहार पूर्ण विचार करूनच करा. जुन्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी संयम ठेवल्यास अडचणी कमी होतील.
♐ धनु – शुभ अंक : २ | शुभ रंग : स्टॉबेरीआज तुमच्या बोलण्याचा प्रभाव इतरांवर पडेल. विरोधकांशी वाद घालण्यापेक्षा कामातून उत्तर देणे फायदेशीर ठरेल. जोडीदारासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी नियोजन करा.
♑ मकर- शुभ अंक : १ | शुभ रंग : भगवाव्यवसायात काही नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. अपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र कामाचा ताण वाढू शकतो. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा आणि आरोग्याकडेही लक्ष द्या.
♒ कुंभ – शुभ अंक : ३ | शुभ रंग : जांभळाआज कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. जुन्या मित्रांशी भेट किंवा फोनवर संवाद होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून संपर्कात नसलेली व्यक्ती पुन्हा भेटू शकते. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.
♓ मीन- शुभ अंक : ७ | शुभ रंग : आकाशीआज कामाच्या क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकते. बांधकाम आणि व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनुकूल घडामोडी अनुभवता येतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्साहवर्धक राहील. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे.
