
नाशिक-: आसनगाव-कसारा दरम्यान तिसऱ्या मार्ग परियोजनेसाठी दि. २१ व २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत खर्डी आणि कसारा स्थानकादरम्यानची उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाही तर मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील मेल-एक्सप्रेस सेवेवरही परिणाम होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा मेल, लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बनारस महानगरी एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्सप्रेस या गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.
