मेष उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. कामात ओळख वाढेल, इंटरव्ह्यूमध्ये यश. विरोधकांशी उगाच भांडू नका. आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खा. शुभ अंक – 1 | शुभ रंग – निळा
वृषभ आज घरात आनंदाची बातमी. नवीन व्यक्तीशी ओळख, प्रेमात चांगला दिवस. पण भागीदारीच्या व्यवसायात घाईने निर्णय नको. ऑनलाइन खरेदीत फसवणुकीपासून सावध राहा. शुभ अंक – 2 | शुभ रंग – पांढरा
मिथुन कामाचा दिवस व्यस्त राहील, अतिरिक्त जबाबदारी मिळेल. घरच्यांसोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. महागडी वस्तू हप्त्यावर घेताना कागदपत्रं नीट वाचा. शुभ अंक – 3 | शुभ रंग – हिरवा
कर्क मेहनतीचं फळ मिळेल, बॉस खूश होईल. जुनी देणी वसूल होतील. कुटुंबातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ अंक – 4 | शुभ रंग – पिवळा
. सिंह घरात पाहुण्यांचं आगमन, आनंदाचं वातावरण. कामाच्या ठिकाणी वातावरण हळूहळू अनुकूल होईल. सुखद बातमी मिळेल. जोडीदाराशी मतभेद असतील तर आज मिटवा. शुभ अंक – 5 | शुभ रंग – केशरी
6. कन्या आज तुमचीच रास चमकणार आहे. नवीन योजना, नवीन ओळख, प्रगतीच्या संधी. सभा-समारंभात मान-सन्मान वाढेल. स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्या. शुभ अंक – 3 | शुभ रंग – गुलाबी
तूळ खर्च वाढेल, गरज नसलेली खरेदी टाळा. प्रदूषणापासून वाचण्यासाठी मास्क वापरा. प्रेमात रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. शुभ अंक – 2 | शुभ रंग – आकाशी
8. वृश्चिक मित्रांशी भेट होईल, टीमवर्कने फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ. व्यवसायात चढ-उतार राहील पण शेवटी फायदा होईल. बोलताना संयम ठेवा. शुभ अंक – 9 | शुभ रंग – लाल
9. धनु आर्थिक लाभाचा दिवस. पितृ संपत्ती, सरकारी कामातून लाभ. पाहुणे येतील. विद्यार्थ्यांना यश. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. शुभ अंक – 2 | शुभ रंग – जांभळा
मकर बिघडलेली कामं मार्गी लागतील. लांबच्या प्रवासाचा योग. शिक्षण आणि गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा बेत होईल. मन प्रसन्न राहील. शुभ अंक – 8 | शुभ रंग – राखाडी
कुंभ आज कोणताही कागद न वाचता सही करू नका. पैसे उसने देणे टाळा. सहकाऱ्यांच्या मदतीने कामं पूर्ण होतील. व्यवसायात अचानक लाभाची शक्यता. आरोग्यात थकवा जाणवेल. शुभ अंक – 7 | शुभ रंग – काळा-निळा
मीन भागीदारीत घाई करू नका, पण नात्यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस. धार्मिक कामात मन लागेल. आर्थिक निर्णय फायदेशीर ठरे शुभ अंक – 6 | शुभ रंग – केशरी-पिवळाआजचा उपाय: रमा एकादशी निमित्त विष्णू सहस्रनामाचा पाठ करा, गाईला हिरवा चारा द्या. पिवळे वस्त्र परिधान करणे शुभ.